Saturday, 20 December 2014

कविता - .सीमेंटचा दगड.. (sea jopulkar)

.सीमेंटचा दगड..


बाजरी पेरली
बाजरी उगवली
गहू पेरला, गहू उगवला
माझी मागची पीढ़ी खपली..!
मी बोअरवेल ने पाणी पेरलं
बुलढोझर ने आभाळ पेरलं
मी पेरत गेलो
माझ्यातुन हरवलेलं
मानुसपण..!
आता मला प्रश्न पडलाय,
न पेरताच कसा आलाय
उगवून हां
सीमेंटचा दगड..?
मातीनंच घेतलंय का
हे असलं सोंग..
की समजलंय मातीलाच
उता-यावर झालीय
'अँम्युनीटि'ची नोंद..!!

sea.jopulkar
(सागरजाधवजोपुळकर)
चांदवड
9404805068

No comments:

Post a Comment